वेत्रीमारन : सामान्यांच्या जगण्याचा हुंकार टिपणारा कल्पक दिग्दर्शक
वेत्रीमारन सिनेमात उभा करत असलेला अवकाश वैशिष्ट्यपूर्ण असतो. झोपडपट्टी, कनिष्ठ वर्ग रहात असलेल्या वस्त्या, पोलीस स्थानक ही स्थळं त्यांच्या चित्रपटाचा एक भाग म्हणून ठळकपणे पडद्यावर येतात. या ठिकाणी राहणारी माणसं, त्यांची रोजगाराची साधनं, त्यांचे दैनदिन व्यवहार, लग्न आणि सण समारंभ यांपासून या वस्त्यामधील गुन्हेगारीकडे वळणारे तरुण, त्यांचे आपापसातील हेवेदावे या सगळ्याचं चित्रण वेत्रीमारन तटस्थपणे करतो.......